French Open 2023 Final: सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यात आज म्हणजेच रविवारी, 11 जून रोजी फ्रेंच ओपन 2023 पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळवला जाईल. नोव्हाक जोकोविचने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लोस अल्कारेझचा पराभव करून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. भारतात कधी, कुठे आणि कसा सामना लाइव्ह पाहता येईल. (french-open-2023-final-live-streaming-telecast-channel-time-in-india-when-where-to-watch-live-tennis-match-tv-online)
नोव्हाक जोकोविचने आतापर्यंत 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. फ्रेंच ओपन 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे, जोकोविच जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. अनुभवी टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धेत सातव्यांदा प्रवेश केला आहे. राफेल नदालनंतर नोव्हाक जोकोविच हा सर्वाधिक वेळा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठणारा खेळाडू आहे. जोकोविचने आतापर्यंत 6 फायनलमध्ये 2 विजेतेपद पटकावले आहेत.
कोठे होणार फायनल?
फ्रेंच ओपन 2023 पुरुष एकेरीचा अंतिम सामना फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील रोलँड गॅरोस येथे नोव्हाक जोकोविच आणि कॅस्पर रुड यांच्यात खेळला जाईल.
अंतिम सामना कधी सुरू होईल?
रविवार, 11 जून रोजी, नोव्हाक जोकोविच आणि कॅस्पर रुड यांच्यातील फ्रेंच ओपन 2023 चा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल.
भारतात टीव्हीवर लाइव्ह कसे बघायचे?
नोवाक जोकोविच आणि कॅस्पर रुड यांच्यात होणारी फ्रेंच ओपन २०२३ ची फायनल सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपित केली जाईल.
WTC Final : रोहितने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा सलामीवीर
मोबाईलवर लाईव्ह कसे बघायचे?
त्याच वेळी, फ्रेंच ओपन 2023 चा अंतिम सामना ‘सोनी लाइव्ह’ अॅपद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल, ज्यामुळे तुम्ही मोबाईलवर सामन्याचे थेट प्रवाह पाहू शकता.
नोव्हाक जोकोविच आणि कॅस्पर रुड हेड टू हेड रेकॉर्ड
नोव्हाक जोकोविच आणि कॅस्पर रुड यांच्यात हा सामना पाचव्यांदा होणार आहे. आता या दोघांमध्ये एकूण चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक वेळी जोकोविचने बाजी मारली आहे. अशा स्थितीत आज अंतिम सामन्यात कॅस्पर रुडला नोव्हाक जोकोविचविरुद्ध विजयाचे खाते उघडायला नक्कीच आवडेल.