IND vs WI: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कसोटी सामन्यांव्यतिरिक्त एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही भारत-वेस्ट इंडिज मालिका लाईव्ह कुठे पाहू शकता? खरं तर, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दूरदर्शन भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे हिंदी-इंग्रजीसह 6 भाषांमध्ये थेट प्रक्षेपण करणार आहे.
भारतीय चाहत्यांना भारत-वेस्ट इंडिज मालिका दूरदर्शनवर हिंदी-इंग्रजीसह 6 भाषांमध्ये पाहता येणार आहे. हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त, दूरदर्शन भारत-वेस्ट इंडिज मालिका तमिळ, तेलगू, कन्नड आणि बांगला भाषांमध्ये थेट प्रक्षेपित करणार आहे. तसेच, चाहत्यांना कोणत्याही सब्सक्रिप्शनशिवाय दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. दूरदर्शन व्यतिरिक्त, भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा आणि फॅन कोडवर देखील उपलब्ध असेल, परंतु यासाठी पैसे मोजावे लागतील.
Photos …तर क्रिकेटर नाही, मच्छीमार झाले असते सुनील गावस्कर; पाहा फोटो
विशेष म्हणजे भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे होणार आहे. 12 जुलैपासून दोन्ही संघ आमनेसामने असतील. भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. तसेच, कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भिडतील.
Doordarshan to broadcast India Vs West Indies in 6 languages:
Hindi, Tamil, Telugu, Bangla, Kannada and English. pic.twitter.com/XYC4xbPReb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 10, 2023