‘नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण…’, हार्दिकने केले घटस्फोटावर शिक्कामोर्तब

हार्दिक पांड्याने एक पोस्ट शेअर करत केली. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस नताशा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं तो म्हणाला.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce : गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasha Stankovic) वेगळे होणार असल्याच्या चर्चा होत्या. अलीकडेच नताशा तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. दरम्यान, आता हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला आहे. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही धक्कादायक बातमी दिली.

विशाळगड हिंसाचाराला सरकार कसं काय जबाबदार? अजितदादांचा संभाजीराजेंना सवाल… 

 

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना हार्दिकने हा निर्णय दोघांसाठी किती कठीण होता हे सांगितले. त्याने लिहिले की, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस नताशा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही आमचं नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण, आता आम्हा दोघांना हाच निर्णय योग्य आहे, असं वाटतं. हा आमच्यासाठी खूप कठीण निर्णय होता. पण, हाच आमच्या हिताचा निर्णय आहे.

…तर मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन; IAS पूजा खेडकर प्रकरणात बच्चू कडुंची उडी! 

या पोस्टमध्ये त्याने मुलगा अगस्त्याबद्दल लिहिले आहे की, अगस्त्यच्या रुपाने आम्हाला आशिर्वादच मिळाला. आमच्या दोघांच्याही आयुष्याचा त्याचे हित केंद्रस्थानी राहील. आम्ही दोघेही पालक म्हणून त्याला शक्य तितके आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला आशा आहे की, तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला समजून घ्याल, अशी पोस्ट हार्दिकने लिहिली.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी दोनदा लग्न केले होते. त्यांनी 31 मे 2020 रोजी लग्नगाठ बांधली हती. मात्र, त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हार्दिक आणि नताशाने पुन्हा लग्न केले. यावेळी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उदयपूरमध्ये या जोडप्याने शाही पद्धतीने दुसरे लग्न केले होते.

Exit mobile version