Hardik Pandya : विश्वचषकातील बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात पायाला झालेल्या दुखापतीतून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अजूनही सावरलेला नाही. या दुखापतीमुळेच त्याला विश्वचषकातील उर्वरित सामने आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला (IND vs SA) मुकावे लागले होते. आता तो लवकरच तंदुरुस्त होण्याचे सांगितले जात असतानाच डोकेदुखी वाढविणारी बातमी आली आहे. आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतही (IND vs AFG Series) हार्दिक खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची माहिती मिळाली आहे. तो जर या मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही तर त्याच्या जागी टीम इंडियाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले जाऊ शकते.
Hardik Pandya : टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर; ‘या’ खेळाडूची एन्ट्री
विश्वचषकात चार सामने खेळल्यानंतर बांग्लादेविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या पायाला जबर दुखापत झाली. या दुखापतीतून तो अजून सावरलेला नाही. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो उपचार घेत आहे. मध्यंतरी त्याने सराव करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे तो लवकरच पुनरागमन करील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा खरी नसल्याचेच आता स्पष्ट होत आहे. आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेत हार्दिक खेळू शकणाार नाही. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे दिली जाऊ शकते, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
या वृत्तानंतर आता हार्दिक पांड्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत दिसणार नाही हे स्पष्ट होत आहे. यानंतर थोड्याच दिवसांत टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आणि टी 20 प्रीमियर लीगचे सामने सुरू होणार आहेत. या स्पर्धांआधी हार्दिक पांड्या दुखापतीतून बरा होणे गरजेचे आहे. सध्या त्याच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाची बाजू थोडी कमकुवत असल्याचे दिसत आहे.
Rohit Sharma : हार्दिकला डच्चू? टी 20 संघाची कमान पुन्हा रोहितच्या हाती, BCCI निर्णयाच्या तयारीत
ऋषभ पंतही संघाबाहेर
ऋषभ पंत दुखापतीतून हळूहळू सावरत असून त्याने क्रिकेटचा सराव पुन्हा सुरू केला आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला तो टीम इंडियात (Team India) पुनरागमन करेल, अशी शक्यता आहे. ऋषभ पंतच्या कारचा मागील वर्षात अपघात झाला होता. या अपघातात तो जखमी झाला होता. पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. बऱ्याच दिवसांपासून तो याच ठिकाणी आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या काही जाहिरातीत पंत दिसला होता. त्यामुळे तो आता लवकरच क्रिकेटमध्ये वापसी करेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.