IND vs SA सूर्यकुमारचे आफ्रिकेत ‘तुफान’ ; शतक झळकवत केला मोठा पराक्रम
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत शानदार शतक झळकविले आहे. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) अवघ्या 55 चेंडूत शतक झळकवत आपल्या टी-20 कारकीर्दीतील चौथे शतक झळकविले आहे. या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर 201 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आफ्रिकेचे चार फलंदाज झटपट बाद केले. नऊ षटकांत आफ्रिकेच्या 66 धावा झाल्या आहेत.
अन्न, नागरी पुरवठा विभागात बंपर भरती, महिन्याला 92 हजारांहून अधिक पगार>
सूर्यकुमारने आपल्या खेळीत सात चौकार आणि आठ षटकार मारले आहेत. सूर्यकुमारने आफ्रिकेच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 76 धावा चौकार आणि षटकारातून काढल्या. त्याने 56 चेंडूत शंभर धावा केल्या. तर आफ्रिकेच्या मैदानावर टी-20त शतक झळकविणारा सूर्यकुमार यादव पहिला भारतीय फलंदाज आहे. सूर्या आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागिदारी केली. यशस्वी जैस्वालने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्यानेही सहा चौकार आणि तीन शानदार षटकार मारले.
आमदार राजळेंच्या सांगण्यावरून मला मारहाण; मढी देवस्थान अध्यक्षांचा गंभीर आरोप
शुबमन गिल ठरला अपयशी
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शुबमन गिल हा अपयशी ठरला आहे. तो बारा धावांवर बाद झाला. तर दुसऱ्या सामन्यात गिल खातेही उघडू शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून गिलची खराब कामगिरी होत आहे. गेल्या सात डावांत तो केवळ दोन वेळाच दोन आकडी धावसंख्या करू शकला आहे.