पुणे : विश्वचषकातील यंदाच्या हंगामातील 17 वा सामना भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर त्याची उर्वरित बॉलिंग माजी कर्णधार विराट कोहली याने पूर्ण केली. त्यानंतर आता जखमी पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे मैदानावर उपस्थित चाहत्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोका चूकला आहे. नेमकं पांड्याला काय झालं आहे हे स्कॅनिंग रिपोर्ट आल्यानंतरच समोर येणार आहे. (Hardik Pandya Health Update)
ICC World Cup | BCCI tweets, "Hardik Pandya's injury is being assessed at the moment and he is being taken for scans."#INDvsBAN
(Pic: BCCI) pic.twitter.com/NKk6qoSdMb
— ANI (@ANI) October 19, 2023
मैदानात नेमकं काय घडलं?
नाणेफेक जिंकल्यानंतर बांग्लादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पांड्या नववी ओव्हर टाकत होता. त्याच्या बॉलिंगवर लिटन दासने फ्रंट शॉट खेळला. हा मारलेला शॉट हार्दिकने पायाने रोखण्याचा प्रयत्न केला. हा मार लागल्यानंतर हार्दिकवर वैद्यकीय पथकाने मैदानावर धाव घेत प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पांड्या गोलंदाजीसाठी पुन्हा उभा राहिला. मात्र, त्याला धावता येत नव्हते. त्यामुळे अखेर त्याला मैदान सोडावे लागले. यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पांड्याची उर्वरित ओव्हर पूर्ण केली.
पुण्यात इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं टीम इंडियासमोर आव्हान
पुण्यातील एमसीए मैदानावर भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्या लढत होणार आहे. विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तान, आफगाणिस्तान आणि बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारतीय संघाचं मनोबल वाढलं आहे. मात्र, असे असतानाही भारतीय संघाला पुण्याच्या मैदानावर गेल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या इतिहासाची म्हणजेच उलटफेराची पुनरावृत्ती टाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
Ind vs Ban : स्टेडियम रिकामेच, मग तिकीटे गेली कुठे? संतप्त क्रिकेट चाहत्यांचा BCCI, MCA ला सवाल
पहिल्या तीन सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवल आहे. त्यामुळे टीम इंडिया ज्या फॉर्ममध्ये आहे ते लक्षात घेता पुण्यात विजयाच्या अपेक्षा आहेत. मात्र, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यांचा इतिहास पाहिला तर, जमेची बाजू ही भारताच्या बाजूने आहे. मात्र, बांग्लादेशने शेवटच्या 4 पैकी 3 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्यात दोन मायदेशात तरस एक सामना श्रीलंकेतील आशिया कप दरम्यान जिंकला आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या खेळाडूंचेही मनोबल वाढलेले आहे. 2007 मध्ये बांग्लादेशने विश्वचषकात भारताला एकदाच पराभूत केले होते. हा भारतीय चाहत्यांसह सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का होता.
एमसीए मैदानावरील रेकॉर्ड काय सांगतात?
आज भारत विरूद्ध बांग्लादेश संघामध्ये पुण्यातील एमसीए मैदानावर सामना सुरू आहे. या मैदानाबाबत सांगायचे झाल्यास टीम इंडियाने येथे 7 वनडे सामने खेळले आहेत त्यापैकी 4 जिंकले आहेत, तर 3 गमावले आहेत. म्हणजे रेकॉर्ड जवळपास समान आहे. येथील खेळपट्टी मोठ्या धावसंख्येची असून, 8 डावात 300 पेक्षा जास्त धावसंख्या उभारण्यात आली आहे. म्हणजेच नाणेफेक जिंकून या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणारा संघ 300 पेक्षा जास्त धावा करून विजयी होऊ शकतो. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत.
नेदरलँडच्या उलटफेरनं वर्ल्डकपचं कॅलक्युलेशन बदलणार का? जाणून घ्या समीकरण
संघात नेमकं कोण कोण?
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज .
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.