Hockey player PR Sreejesh retirement announcement : भारतीय हॉकी खेळातून एका अध्यायाचा अंत होणार आहे. कारण भारतीय हॉकी (Hockey player) टीममधील अनुभवी खेळाडू पीआर श्रीजेश (PR Sreejesh) याने निवृत्ती जाहीर (retirement announcement) केली आहे. ही स्पर्धा त्याच्यासाठी शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यानंतर तो भारतीय टीम मधून खेळताना दिसणार नाही.
तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
श्रीजेशने वयाच्या 18 ते 19 व्या वर्षी पहिल्यांदा भारतीय हॉकी टीममध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. जिल्ह्यातील एर्नाकुलम कीझक्कम्बलम या गावात एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. भारतीय हॉकी टीमचा तो कॅप्टन राहिला असून तसेच तो भारतीय पुरुष संघाचा मजबूत आधारस्तंभ राहिला आहे.
विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढणार, राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं विधान
सुरुवातीला श्रीजेशला हॉकी नाही तर अथलेटिक्स आवडत होतं. त्यासाठी त्याने स्प्रिंट, लांब उडी आणि हॉलीबॉलमध्ये देखील भाग घेतला. मात्र त्याच्या प्रशिक्षकाने त्याला हॉकी खेळण्यासाठी तयार केलं. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने 2014 अशियाई खेळ- सुवर्ण पदक, 2018 अशियाई खेळ- कांस्य पदक, 2018 अशियाई चॅपियन्स ट्रॉफी- संयुक्त विजेता, 2019 FIH सीरीज फायनल- स्वर्ण पदक, 2021 FIH हॉकी प्रो लीग- तीसरी पोजिशन, 2022 कॉमनवेल्थ गेम्स – रजत पदक या पदकांना गवसणी घातली आहे.