विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढणार, राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं विधान

विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढणार, राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं विधान

Prakash Mahajan : लोकसभेनंतर आता सर्वज पक्षांनी विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तयारी सुरू केली आहे. भाजप (BJP), काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मोठं वक्तव्य केलं.

मी तुला आतून बाहेरून ओळखतो…; स्वाभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर तुपकरांचे टीकास्त्र 

लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र आता मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं दिसतं. 13 जून रोजी मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी एक वक्यव्य केलं होतं. मनसे 20 जागा लढवणार असल्याची पुडी कोणी तरी सोडली. 20 जागाच का? आपण 200 ते 225 जागांवर निवडणूक लढवू, असं राज ठाकरे तेव्हा म्हणाले होते.

Assembly Election: विधानसभेसाठी संभाजीराजे आणि आंबेडकरांचे पणतू एकत्र येणार ? 

तर आज माध्यमांशी बोलतांना प्रकाश महाजन यांनीही सांगितले की, मनसे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. याबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल राज ठाकरेंना दिला जाणार आहे. आम्ही राज्यात 200 ते 215 जागांवर निवडणूक लढवणार आहोत, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.

मराठा आरक्षणाबाबत बोलतांना महाजन म्हणाले की, राज्यात आजपर्यंत कधी न दिसलेली जाती जातीतील तेढ दिसत आहे. आता यावर राजकीय मंडळी पोळी भाजून घेत आहेत. आर्थिक निकषावर आधारावर आरक्षण देण्याची राज ठाकरेंची भूमिका आहे. मनसेने कधीही जात-पात पाहिली नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. असं असताना मनोज जरांगे पाटील यांना सारखे उपोषण का करावे लागले, असा सवाल महाजन यांनी केला.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. मुस्लिम त्यांच्या आणि ते मुस्लिमांच्या इतके प्रेमात पडले आहेत की त्यांनी शंकराचार्यांना घरी आणून त्यांचे पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे वळणार नाहीत, अशा शब्दात महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीकी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube