पक्षात दिवाळी अन् माझ्या घरात अंधार; राज ठाकरेंचे ज्येष्ठ सहकारी प्रकाश महाजनांना अश्रू अनावर

पक्षात दिवाळी अन् माझ्या घरात अंधार; राज ठाकरेंचे ज्येष्ठ सहकारी प्रकाश महाजनांना अश्रू अनावर

Prakash Mahajan on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होत सल्याची चर्चा असतानाच आता मनसेतुनच मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि राज ठाकरे (Thackeray) यांनी बाजू भक्कमपणे मांडणारे प्रकाश महाजन यांनी आता पक्षावरची उघड नाराजी बोलून दाखवली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरासाठी स्वत: राज ठाकरेंसह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. मात्र, या शिबिराला प्रकाश महाजन यांनाच निमंत्रण दिलेलं नाही. प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांचा मीडियातील वावर यावरुन त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा आहे.

महाजन यांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली. भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टीपण्णी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. मी नाराज नाही, खिन्न आणि दुःखी आहे असंही प्रकाश यावेळी महाजन म्हणाले. तसंच, शिबिरासाठी बोलावलं नाही. मात्र, पक्षाच्या निष्कर्षामध्ये प्रवक्त्यांना बोलावलं नाही. इतर प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे इतर पदांची जबाबदारी असेल, माझ्याकडं नाही. त्यामुळं मला निमंत्रण आलं नाही. पक्षाचा निर्णय आहे, कुणाला बोलवाव, कुणाला नाही. हा माझ्यासाठी दुर्दैवी क्षण आहे काय बोलणार, असं प्रकाश महाजन यावेळी म्हणाले.

राज-उद्धव युतीवर प्रकाश महाजन भावूक; उद्या मरण आलं तरी चालेल, बाळासाहेबांना सांगेन

घरच्या लोकांसमोर तोंड राहिलं नाही. ठीक आहे मला फार काही बोलायचं नाही. मी इतर कुणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान आणि गर्व वाटेल असंच काम मी केलं. प्रवक्ता म्हणून केलं. भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी खंत बोलून दाखवली. त्याचबरोबर मी ठरवलंय मी देव बदलणार नाही, देवानं बोलवल्याशिवाय जाणार नाही. मी कुणावर नाराज नाही. आपलं नशीब, आपलं भांडण, नशीब असेल तर हार-जीत होते. दोन भावाच्यां युतीबाबत वक्तव्य केलं होतं. हे कोणाला पटलं नसेल तर त्याची माफी मी नेत्याकडे मागितली आहे, असं महाजनांनी नमूद केलं.

दोन भाऊ एकत्र आले तर माझा फायदा काय आणि नुकसान काय? भाऊ नसण्याचं काय दुःख आहे हे मला माहीत होतं. ते एकत्र यावे ही मी भावना बोलून दाखवली. ही भावना चुकली असेल पण पक्षात दिवाळी आहे म्हणजे पक्षाचे शिबिर सुरू आहे आणि माझ्या घरात अंधार अशी सध्या स्थिती आहे. माझं बोलणं, माझा मीडियातला वावर मला त्रासदायक ठरला. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे. माझी आता भावना झाली आता बस झालं आपल्याला घरातच मान नाही तर इतर ठिकाणी काय मिळणार? असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत. अशा पद्धतीने पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडाने पक्षाची बाजू मांडू असं म्हणत प्रकाश महाजन यांच्या डोळ्यात पाणी आले. फेसबुकवर प्रतिक्रिया येतात याला पक्षातच किंमत नाही. नसलेले आरोप माझ्यावर टाकले जातात. मी गेल्या तीन चार दिवस अस्वस्थ आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube