राज-उद्धव युतीवर प्रकाश महाजन भावूक; ‘उद्या मरण आलं तरी चालेल, बाळासाहेबांना सांगेन…’

राज-उद्धव युतीवर प्रकाश महाजन भावूक; ‘उद्या मरण आलं तरी चालेल, बाळासाहेबांना सांगेन…’

Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. अनेक वर्षांनंतर होणाऱ्या या मिलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हलचल निर्माण झाली आहे.

आनंदसोहळा…

या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शुक्रवारी दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना प्रकाश महाजन भावुक झाले. त्यांच्या भावना ओसंडून वाहताना दिसल्या. प्रकाश महाजन (MNS) म्हणाले की, उद्या राज आणि उद्धव ठाकरे (Shiv Sena) एकत्र येणार आहेत. ही गोष्ट बघून मी मेलो तरी खंत नाही. मी वर गेलो तर बाळासाहेबांना सांगेन, ‘साहेब, तुमचे दोन्ही मुलं एकत्र आले आहेत, मराठी माणसासाठी एकवटले आहेत.

Video : हजार माराव्या अन्…; शिंदेंच्या ‘जय गुजरात’ नंतर राऊतांंसह ठाकरेंच्या वाघिणींनी सोडला ‘बाण’

भाऊ म्हणजे आधार…

प्रकाश महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, राज-उद्धव यांचं हे एकत्र येणं केवळ दोन नेत्यांचं एकत्र येणं नाही, तर हे मराठी अस्मितेचं पुन्हा जागरण आहे. मी बाळासाहेबांच्या समाधीपाशी येऊन हेच सांगायला आलो होतो. मी त्यांना प्रत्यक्ष सांगू शकत नाही, पण उद्या मरण आलं तरी वर जाऊन नक्की सांगेन की, हे दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.मी माझे दोन्ही भाऊ गमावले. भाऊ म्हणजे आधार असतो. आता हे दोन भाऊ राज आणि उद्धव एकमेकांना आधार देतील, हे निश्चित आहे. मराठी भाषेसाठी, शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी ही दोघं एकत्र येत आहेत. ही आमच्या सगळ्यांची इच्छा होती, आणि ती पूर्ण होणार आहे.

Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवलं, दोघांचा मृत्यू

ब्रह्मदेव जरी खाली उतरला…

प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव यांच्या स्वभावाचं विश्लेषण करत म्हटलं, मी दोघांसोबत दौरे केले आहेत. राजसाहेब हे जळजळते निखारे आहेत आणि उद्धवजी शीतल सावलीसारखे. शरद पवार साहेबांनी एकदा म्हटलं होतं की, राजसाहेबांच्या सभेला गर्दी होते आणि उद्धवजींच्या सभेतील गर्दीचं मतात रूपांतर होतं. आता ही गर्दी आणि मतं एकत्र येणार आहेत. राज्याच्या राजकारणात जे कोल्हे आहेत, ते या युतीला तोडण्याचा प्रयत्न करतील. पण आता ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी, ही युती कोणीही मोडू शकत नाही. हे दोन भाऊ आता मराठी जनतेसाठी हक्काचं ठिकाण आहेत, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube