तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Big Boss Marathi New Season Coming : मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे. रितेश देशमुख आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवणार आहे.

विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढणार, राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं विधान

‘बिग बॉस मराठी’च्या या चक्रव्यूहात विविध क्षेत्रातील कमाल अतरंगी स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता हे अतरंगी स्पर्धक कोण? यंदाच्या सिझनची थीम काय असेल? अशा अनेक रहस्यांचा उलगडा ‘बिग बॉस’प्रेमींना आता लवकरच होणार आहे.’बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रोमोमध्ये रितेश देशमुखची ‘लयभारी’ स्टाईल पाहायला मिळाली. पण आता मात्र नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

मी तुला आतून बाहेरून ओळखतो…; स्वाभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर तुपकरांचे टीकास्त्र

रितेश या सिझनमध्ये कुणाचा मित्र होणार की कुणाचा गुरू होणार? कुणाबरोबर ग्रॅन्ड मस्ती करणार नि कुणाबरोबर लय भारी दोस्ती करणार? कुणाचं काही चुकलं तर भाऊ कानही उपटणार आणि कधी कुणाची पाठही थोपटणार आहे! रितेश भाऊचा हा अनोखा अंदाज पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आता उत्सुक आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाबद्दल रितेश देशमुख म्हणाला’, “बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची खूप उत्सुकता आहे. अनेक वर्षांपासून मी हा शो फॉलो करतोय. आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट म्हणून ‘कलर्स मराठी’सोबत जोडला गेल्याचा आनंद आहे. ‘बिग बॉस मराठी’ला नव्या ढंगात, नव्या रुपात पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे. नव्या सीझनमध्ये राडा, धुरळा, मजा-मस्ती आणि लय भारी कल्ला होणार.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube