Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात वेल्सचा 3-1 असा पराभव केला आहे. नेदरलँड्समधील ॲमस्टेलवीन येथील वागेनर हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतासाठी संजय राणा आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी गोल नोंदवले, तर वेल्ससाठी सॅम वेल्शने एकमेव गोल केला.
पहिल्या सत्रात दोन गोल
सामन्याच्या सुरुवातीपासून भारताने वर्चस्व राखले होते. पहिल्या सत्रात भारताने दोन गोल केले. पहिला विश्वचषक खेळणाऱ्या संजय रानाने 8 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा पुरेपूर फायदा घेत भारतासाठी गोल केला. त्यानंतर 11 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली. तर दुसऱ्या सत्रात कोणताही गोल झाला नाही. मध्यंतरापर्यंत भारताकडे 2-0 अशी आघाडी होती.
HOCKEY WORLD CUP 2026
India lead Wales 2-0 at half-time in their opening match.
India have been the more dominant side throughout the first half, though Wales did manage one promising attack into the Indian circle. However, their effort struck the side of the goal.… pic.twitter.com/iPYdGKFwzW
— myKhel.com (@mykhelcom) August 15, 2026
तिसऱ्या सत्रात 42 व्या मिनिटाला भारताला पुन्हा एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारतीय संघाने या संधीचा फायदा घेत आपली आघाडी वाढवली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) या सामन्यातील दुसरा आणि विश्वचषकाच्या इतिहासातील एकूण आठवा गोल केला. मागील विश्वचषकात त्याने सहा गोल केले होते, ज्यामुळे तो या स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा दुसरा खेळाडू ठरला होता.
पहिला दिवस भारताच्या नावावर, पडिक्कलचे शानदार शतक; श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडला घाम
तर शेवटच्या सत्रात वेल्स संघासाठी वेल्शने 55 व्या मिनिटाला गोल करत खाते उघडले. आता भारतीय संघ 17 ऑगस्ट रोजी इंग्लंडचा सामना करणार आहे.
