Download App

World Cup 2023 Scheduled : भारत-पाकसह 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या; पहा नवे शेड्युल

  • Written By: Last Updated:

World Cup 2023 Timetable : क्रिकेटप्रेमी विश्वचषकाची (World Cup 2023) आतुरतेने वाट पाहत आहेत. ICC एकदिवसीय विश्वचषकाची सुरूवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. यंदा भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाच वातावरण आहे. मात्र आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात आता किरकोळ बदल केलेत. त्यामुळं आता भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना 15 ऑक्टोबर ऐवजी 14 आक्टोबरला खेळल्या जाणार आहे. वेळापत्रकांचा बदल करतांना सामना खेळवल्या जाणाऱ्या ठिकाणात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळं हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. (ICC announces revised World Cup 2023 schedule  India vs Pakistan now on October 14)

आयसीसी आणि बीसीसीआयने तारीख बदलण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे पाठवला होता. त्याला पीसीबीने मान्यता दिली आहे. त्यानंतर आयसीसीने भारत-पाकिस्तान आणि पाकिस्तान-श्रीलंका सामन्यांच्या तारखेतही बदल केला. नव्या बदलानुसार, बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक 2023 सामना हा 15 आक्टोबर रोजी खेळला जाणार होता. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार, हा सामना आता एक दिवस आधी म्हणजे, 14 ऑक्‍टोबरला ठेवण्यात आला आहे.

या सामन्यांच्या तारखांमध्येही झाला बदल

भारत आणि पाकिस्तान संघातील होणाऱ्या सामन्याशिवाय अन्य संघांच्या सामन्यांच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. यात हैदराबादमध्ये होणारा श्रीलंकेविरुध्द पाकिस्तानचा सामना 12 आक्टोबर रोजी होणार होता. मात्र, त्यातही बदल करण्यात आला असून, आता हा सामना 12 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर (मंगळवारी) होणार आहे. तर, लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाची मोठी लढत 13 आक्टोबर ऐवजी १२ ऑक्टोबरला होणार आहे.

जादुची झप्पी ते थेट फ्लाईंग किस्स; लोकसभेतील गाजलेले राहुल गांधींचे किस्से 

दिल्लीतील अफगाणिस्तानविरुद्ध इंग्लंडचा 14 ऑक्टोबरला होणारा सामना आता एक दिवस पुढे ढकलला आहे. त्यामुळे हा सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्याचप्रमाणे, न्यूझीलंडचा बांगलादेश विरुद्धचा सामना, चेन्नई येथे 14 ऑक्टोबर रोजी नियोजित केलेला सामना एक दिवस आधी होणार आहे. त्यामुळं हा सामना 13 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाईल.

स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून, धर्मशाला येथे होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला आहे. आता हा सामना एक दिवसाचा सामना बनला आणि तो मूलतः नियोजित झाल्यानंतर सकाळी 10:30AM (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल.

तर लीग अंतिम टप्यातील 12 नोव्हेंबरच्या रोजी होणाऱ्या सामन्यातही बदल केले. १२ नोव्हेंबर रोजीचा सामना ११ नोव्हेंबरला होणार आहेत. पुण्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानचा सामना (10.00 AM) आणि कोलकातामध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (02:00PM) वाजता होणार आहे.

Tags

follow us