झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक पात्रता सामन्यांत उत्सुकता पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकन वेगवान गोलंदाज अली खानने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विकेट घेतल्यानंतर अलीचे अनोखा सेलिब्रेशन पाहून सर्व क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले. (icc-cricket-world-cup-qualifiers-2023-usa-bowler-ali-khan-mouth-tape-celebration-goes-viral-watch-video)
नेदरलँडच्या डावातील तिसऱ्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या अली खानने शेवटच्या चेंडूवर विक्रमजीत सिंगचा स्वतःच्या चेंडूवर झेल टिपला. अंपायरच्या दिशेने चेंडू फेकल्यानंतर अलीने खिशातून टेपचा तुकडा काढून तोंडाला लावला. अली खानच्या सेलिब्रेशनच्या पद्धतीने स्टेडियममध्ये उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षक थक्क झाले.
आता अली खानचा असा सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, अलीने विकेट घेतल्यानंतर असे सेलिब्रेट करण्याचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
IND vs PAK फुटबॉल: एकटा भारतीय प्रशिक्षक भिडला पाकिस्तानी खेळाडूंशी, व्हिडिओ व्हायरल
नेदरलँड्सने हा सामना 5 विकेटने जिंकला
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 211 धावा केल्या. यामध्ये सयान जहांगीरने 86 चेंडूत 71 धावांची खेळी केली. नेदरलँड्स संघाने 43.2 षटकात 5 विकेट गमावून 212 धावांचे आव्हान पूर्ण केले. नेदरलँड्सकडून स्कॉट एडवर्ड्सने 67 तर तेजा निदामानुरूने 58 धावा केल्या.