T20 World Cup Anthem : यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन्ही (T20 World Cup Anthem) देशांत होणार आहे. या स्पर्धेचे नियोजन आयसीसीकडून सुरू आहे. आता आयसीसीने विश्वचषक स्पर्धेसाठी अँथम साँग टीझर लाँच केला आहे. या अँथम साँगचा निर्माता टॅनो मोटँनो आहे. या गाण्यात अनेक सुपरस्टार दिसतील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली. येत्या 2 जूनपासून टी 20 विश्वकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या अँथम गाण्यात ग्रॅमी पुरस्कार विजेता सीन पॉल दिसणार आहे. तसेच केस डायफेन्थॉलरही गाताना दिसेल. त्रिनिदादामधील केस द बाँडचा प्रमुख गायक आहे.
Jasprit Bumrah : कसोटी गोलंदाजांतही ‘बुमराह’ नंबर वन; आयसीसीनेच केलं शिक्कामोर्तब
या गाण्याची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून होती. अखेर या गाण्याची घोषणा आयसीसीने केली आहे. सीन पॉल आणि केस डायफेन्थॉलर या दोघांनीही या गाण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या गाण्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्रित आणणे हा आमचा हेतू आहे, असे केस म्हणाला. या गाण्याची क्रिकेट चाहत्यांंना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती.
Only 50 days until the ICC Men's #T20WorldCup 2024 kicks off in the USA and West Indies 💫
Marking the special occasion with a sneak peek of the official tournament anthem ft. some well-known superstars 🤩
More ➡️ https://t.co/wm3KgXpOfS pic.twitter.com/2hCfhF981A
— ICC (@ICC) April 12, 2024