Download App

Rohit Sharma : रो’हिट’ कामगिरी! षटकार खेचला अन् गांगुलीचा रेकॉर्ड मोडला

Rohit Sharma : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात आला आहे. साखळी फेरीत आज टीम इंडियाचा सामना नेदरलँड्स विरोधात सुरू आहे. यानंतर सेमी फायनल राऊंडला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 16 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. साखळी फेरीतील हा अखेरचा सामना आहे. हा सामनाही जिंकण्याच्याच इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक अनोखा विक्रम केला आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास, आता हिटमॅन पहिल्या क्रमांकावर

या सामन्यात शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी धडाकेबाज सुरुवात केली. सामन्यातील सातव्या ओव्हरमध्ये रोहितने पहिला षटकार खेचत आणखी एक जागतिक रेकॉर्डवर नाव कोरलं. विश्वचषक स्पर्धेच्या एका आवृत्तीत भारतीय कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. याआधी 2003 मध्ये त्याने 11 सामन्यात 465 धावा केल्या होत्या. रोहितच्या नावावर 442 धावा असून गांगुलीला मागे टाकण्यासाठी त्याला फक्त 24 धावांची गरज होती. या सामन्यात रोहितने गांगुलीचा हा विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सलामीवीर म्हणून 14 हजार धावांचा टप्पाही आज रोहित शर्माने पार केला. विरेंद्र सेहवाग (15758), सचिन तेंडुलकर (15335), रोहित शर्मा (14005), सुनील गावसकर (12258) आणि शिखर धवन (10687) या फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

रोहित सिक्सर किंग, डिव्हिलियर्सलाही पछाडले 

विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. सुरुवातीपासूनच त्याने त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला आहे. प्रत्येक डावात त्याने चौकार आणि षटकार ठोकले आहेत. त्याच्या याच खेळामुळे हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आता सिक्सर किंग बनला आहे. शिवाय आता तो वनडे मध्ये एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने आता दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा एका वर्षातील सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला आहे. डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 20 एकदिवसीय सामन्यात 58 षटकार मारले होते. तर रोहित शर्माने 2023 मध्ये आतापर्यंत 59 षटकार मारले आहेत.

टीम इंडियात कोणताच बदल नाही 

या सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाने भारतीय संघात कोणताही बदल केलेला नाही. सेमीफायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. या सामन्याआधी रणनितीत कोणताही बदल केला जाणार नाही, असे संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याचीही शक्यता असल्याचे सांगितले जात होते. मात्र तसे काही झाले नाही. प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांना कदाचित विश्रांती मिळू शकते. तर आर. अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो अशी शक्यता होती. परंतु, कोणताही बदल झालेला नाही.

Tags

follow us