Download App

ICC साठी रोहितचं ‘बेस्ट’ कॅप्टन; दोन ट्रॉफीज् मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला बाहेरचा रस्ता

  • Written By: Last Updated:

ICC Playing XI Of World Cup 2023 : विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच (ICC) ने विश्वविजेत्या संघाच्या कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ICC नं 2023 विश्वचषकासाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर केले असून, या संघात 6 भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या या संघात भारतीय संघाचा हिटमॅन म्हणून ओळख असलेल्या रोहित शर्मावर (Rohit Sharma) कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभवानंतरही ICC साठी रोहित शर्मांचं बेस्ट कॅप्टन असल्याचे समोर आले आहे. 2023 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या रचिन रवींद्र तसेच स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांना  आयसीसीने संघात स्थान दिलेले नाही.

World Cup विजयानंतर कांगारुंचा विजयी उन्माद! पायाखाली ट्रॉफी घेत मिचेल मार्शचे फोटोसेशन

भारताच्या 6 खेळाडूंना स्थान

ICC ने जाहीर केलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये भारतीय संघातील 6 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यात विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. संघात समावेश करण्यात आलेल्या विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा केल्या आहेत. तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 24 बळी घेतले आहेत. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीमागेही चांगली कामगिरी केली आहे.

ICC च्या जाहीर करण्यात आलेल्या संघात सहा भारतीय खेळाडूंसह श्रीलंकेचा एक, न्यूझीलंडचा एक, दक्षिण आफ्रिकेचा एक आणि विजेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा आयसीसीच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या दिलशान मदुशंका, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

World Cup : दहा वर्षात नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव : टीम इंडिया बनली ‘नवी’ चोकर्स?

ICC 2023 वर्ल्ड कपच्या बेस्ट इलेवनमध्ये कोण-कोण?

ICC ची 2023 विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यात WTC आणि विश्वचषक मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ICC नं जाहीर केलेल्या संघात क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरिल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी आदी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

Tags

follow us