Download App

ICC Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार खेळीचा कोहली-राहुलला फायदा, पाहा नवीन क्रमवारी

ICC Ranking : विराट कोहली आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी केली होती. आता दोन्ही खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत (ODI Ranking) फायदा झाला आहे. विराट कोहलीला आयसीसी क्रमवारीत 2 स्थानांचा फायदा झाला आहे. आता विराट कोहली नवव्या क्रमांकावर आला आहे. केएल राहुलने 15 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता केएल राहुल 15 व्या क्रमांकावर आहे. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

क्रमवारीत किती बदल झाला आहे?
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावणारा क्विंटन डी कॉक सातव्यावरुन सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या यष्टीरक्षक फलंदाजाला एका स्थानाचा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 21 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या खेळाडूने 11 स्थानांची झेप घेतली आहे.

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध फ्लॉप ठरलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध न खेळलेला शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावणाऱ्या डेव्हिड मलानला क्रमवारीत फायदा झाला आहे.

टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार’

कुलदीप यादवला क्रमवारीत फायदा झाला
डेव्हिड मलानने आयसीसी क्रमवारीत 7 स्थानांनी झेप घेतली आहे. आता डेव्हिड मलान आठव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला 3 स्थानांचे नुकसान झाले आहे. आता इमाम उल हक सातव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड अव्वल स्थानावर आहे. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला 3 स्थानांचा फायदा झाला आहे. आता कुलदीप यादव आठव्या क्रमांकावर आहे.

Tags

follow us