ICC T20 Rankings : भारतीय संघाचा लेग स्पिनर रवि बिश्नोईने आयसीसी टी20 च्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावलं आहे. रवि बिश्नोईने रशीद खानला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत रवि बिश्नोई उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. एकूण पाच सामन्यात रविने 9 बळी घेतले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रविला गौरवण्यात आलं होतं.
23 वर्षीय रवि बिश्नोईने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये पदार्पण केल्यापासून भारतासाठी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. त्याने T20 मध्ये एकूण 34 विकेट्स घेतल्या आहेत. रविच्या चांगल्या कामगिरीमुळे तो लेग-स्पिनर युझवेंद्र चहलच्याही पुढे गेला आहे. 699 रेटिंग गुणांवर असलेल्या बिश्नोईने पाच स्थानांनी झेप घेत अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानला (692) अव्वल स्थानावरून मागे टाकले आहे. दरम्यान, गोलंदाजीच्या यादीत अव्वल-पाच स्थाने फिरकीपटूंनी सर्वात लहान फॉरमॅटमध्ये मिळवली आहेत.
Sanjay Shirsath : स्वाभिमान गाडला गेला, आता लोकांची पालखी वाहावी; शिंदेंच्या आमदाराचा ठाकरेंना टोला
गोलंदाजांच्या यादीत रशीद खान (दुसरा), आदिल रशीद (तिसरा), वानिंदू हसरंगा (समान तिसरा) आणि महेश थेक्षाना (पाचवा) हे सर्व टॉप 10 मध्ये एक स्थान घसरले आहे, तर भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल 16 क्रमांकावरुन 11 व्या क्रमांकावर गेला आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत, यशस्वी जैस्वालने 16 वे स्थान मिळवून 19 व्या स्थानावर ठेवले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड 16 व्या क्रमांकवरुन 29 व्या क्रमांकावर गेला आहे.