World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानने आणखी एक उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानला 8 विकेट राखून धूळ चारली आहे. चेन्नईमध्ये आज पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने 283 धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानसमोर ठेवलं होतं. हे लक्ष्य अफगाणिस्तानने 49 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे. विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंड संघाचा पराभव केला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 284 धावांच्या धावांचा बचाव करताना पाकिस्तानच्या प्लेयरने खराब फिल्डिंग केली. सोपे झेल सोडले, त्यामुळे अफगाणिस्तान संघाने सहज विजय मिळवता आला आहे.
Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
यामध्ये गुरबाज 65, जादरन 87 धावांचे योगदान दिले. तर रहमत शाहने नाबाद 77 धावांची मॅचविनिंग खेळी केली. सोबतच कर्णधार शाहीदीनेही नाबाद 44 धावांचे संघाला योगदान दिले.
‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी
अफगाणिस्तानच्या जिगरबाज संघानं पाकिस्तानचा 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. या विश्वचषक स्पर्धेतला हा अफगाणिस्तान संघाचा दुसरा मोठा विजय मानला जात आहे.
India vs New Zealand : हार्दिक पांड्याच्या जागी कोणाला मिळणार संधी? ‘या’ नावांची चर्चा
अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यानंतर आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानलाही धूळ चारण्याचा पराक्रम केला आहे.
ODI World Cup 2023 : बाबर आझम चिडला! ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
दरम्यान, या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानला विजयासाठी ५० षटकांत २८३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी यशस्वी पाठलाग केला. रहमान उल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह आणि कर्णधार हशमत आफ्रिदीनं जबाबादारीनं खेळ करून आपल्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिला आहे.