Download App

बीसीसीआयने यंदा भरला 1159 कोटींचा आयकर, पाच वर्षांतील आकडेवारी जाहीर

Income Tax Return 2022-23: बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. आयपीएल सुरु केल्यापासून बीसीसीआयचा महसूल देखील अनेक पटींनी वाढला आहे. याचा फायदा भारत सरकारच्या तिजोरीवरही झाल्याचे दिसून आले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

बीसीसीआयने 2021-22 या आर्थिक वर्षात 1,159 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 37 टक्के अधिक आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान देणार राजीनामा; असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस

यासोबतच पंकज चौधरी यांनी बीसीसीआयने भरलेला आयकर आणि गेल्या पाच वर्षांत दाखल केलेल्या रिटर्नच्या आधारे उत्पन्न आणि खर्चाचा तपशीलही सादर केला. आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात, बीसीसीआयने 844.92 कोटी रुपये आयकर भरला आहे. तर 2019-20 मध्ये 882.29 कोटी रुपये भरला आहे.

बीसीसीआयने 2017-18 मध्ये 596.63 कोटी रुपये कर भरला तर 2018-19 या आर्थिक वर्षात 815.08 कोटी रुपये आयकर भरला आहे. बीसीसीआयला 2021-22 या आर्थिक वर्षात 7,606 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, तर त्याचा खर्च सुमारे 3,064 कोटी रुपये होता. 2020-21 या आर्थिक वर्षात त्याचे उत्पन्न 4,735 कोटी रुपये होते आणि खर्च 3,080 कोटी रुपये होता.

Tags

follow us