Download App

IND A vs PAK A : अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवत पाकिस्तानने पटकावला आशिया चषक

  • Written By: Last Updated:

Emerging Teams Asia Cup 2023 Final :  इमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये पाकिस्तान अ ने भारत अ संघाचा 128 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने विजेतेपदावर कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना संघाने भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव 224 धावांवर आटोपला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 61 धावा केल्या. अभिषेक व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. पाकिस्तानकडून तैयब ताहिरने शतक झळकावले. (Ind A Vs  Pak A  Pakistan  A Win By 128 Runs Against India A Final Emerging Teams Asia Cup 2023)

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून साई सुदर्शन आणि अभिषेक सलामीला आले. सुदर्शन 28 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. तर अभिषेकने अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या. निकिन जोसने 11 धावा केल्या. कर्णधार यश धुलने 4 चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. निशांत सिंधू 9 धावा करून बाद झाला. रियान पराग 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हर्षित राणाने 13 धावांचे योगदान दिले. राज्यवर्धन 11 धावा करून बाद झाला. मानव सुथार 7 धावा करून नाबाद राहिला.

पाकिस्तानकडून सुफियान मुकीमने ३ बळी घेतले. त्याने 10 षटकात 66 धावा दिल्या. अर्शद इक्बालने 7 षटकात 34 धावा देत 2 बळी घेतले. मेहरान मुमताज आणि मोहम्मद वसीम ज्युनियरनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुबासिर खानने एक विकेट घेतली.

Video : ‘नो बॉल’ तरी देखील साई सुदर्शन आऊट, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नवा वाद

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान अ संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 352 धावा केल्या. संघासाठी तैयब ताहिरने शतक झळकावले. त्याने 71 चेंडूत 108 धावा केल्या. ताहिरच्या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सलामीवीर साहिबजादा फरहानने 62 चेंडूत 65 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. अयुबने 51 चेंडूत 59 धावा केल्या. उमर युसूफने 35 धावांचे योगदान दिले. मुबासिर खानने 47 चेंडूत 35 धावा केल्या. मोहम्मद वसीम ज्युनियर 17 धावा करून नाबाद राहिला.

भारत अ संघाकडून गोलंदाजी करताना रियान परागने 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. राज्यवर्धनने 6 षटकात 48 धावा देत 2 बळी घेतले. हर्षित राणाने 6 षटकात 51 धावा देत एक विकेट घेतली. मानव सुथार आणि निशांत सिंधूलाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Tags

follow us