Download App

IND vs AFG 3rd T20 : अफगाणिस्तानला व्हाईटवॉश की पावसाचा खेळ? जाणून घ्या, हवामानाचा अंदाज

IND vs AFG 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अखेरचा टी 20 सामना आज (IND vs AFG 3rd T20) बंगळुरूच्या एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. आधीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने (Team India) मालिकाही जिंकली आहे. त्यानंतर आजचा तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला (Afghanistan) व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तर दुसरीकडे शेवटचा सामना जिंकून सन्मानजनक स्थितीत येण्याचा अफगाणिस्तानच्या संघाचा प्रयत्न राहणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगले प्रदर्शन करील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, आज बंगळुरूमध्ये हवामान ढगाळ राहणार आहे. परंतु, पावसाची शक्यता नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ स्टार खेळाडूंचा पत्ता कट

या मालिकेतील तिसरा सामना आज सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. आज बंगळुरूत ढगाळ हवामान राहिल मात्र पावसाची शक्यता नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या मैदानावर आतापर्यंत 9 टी 20 सामने झाले आहेत. या सामन्यात फक्त एकदाच 200 पेक्षा आधिक धावा करू शकला आहे. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 सामन्यात भारतीय संघाने 160 धावांची मजल मारली होती.

या सामन्यासाठी रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, आवेश खान/वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह असा भारताचा संघ असेल. यानंतर या संघात ऐनवेळी बदल होण्याचीही शक्यता आहे. जर बदल झालाच तर नव्या कोणत्या खेळाडूला संधी मिळाली आणि कुणाचा पत्त कट झाला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IND vs AFG : आज दुसरा सामना, विराटचे कमबॅक! ‘या’ खेळाडूचा पत्ता होणार कट

follow us