IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ स्टार खेळाडूंचा पत्ता कट

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ स्टार खेळाडूंचा पत्ता कट

IND vs ENG Test Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर इंग्लंड संघ भारत (IND vs ENG Test Series) दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार असून यातील सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा (IND vs AFG T20 Series) पराभव केला आहे.

Video : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा; के. एल. राहुल-अय्यरचे पुनरागमन

या मालिकेसाठी भारतीय संघात तीन विकेटकीपर फलंदाजांना संधी मिळाली आहे. यामध्ये केएल राहुल, केएस भरत आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. इशान किशनला मात्र संधी मिळाली नाही. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर संघात आहेत. तसेच कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांचाही संघात समावेश आहे. अंतिम अकरा खेळाडूत कुणाला संधी मिळते याबाबत अद्याप काही ठरलेले नाही.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएस भरत, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, सिराज, मुकेश कुमार, जसप्रित बुमराह आणि आवेश खान यांचा समावेश आहे.

Team India : सलग दहा विजय, फायनलध्ये धडक; पडद्यामागचा ‘हिरो’ निवृत्तीच्या वाटेवर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज