IND vs AFG : आज दुसरा सामना, विराटचे कमबॅक! ‘या’ खेळाडूचा पत्ता होणार कट

IND vs AFG : आज दुसरा सामना, विराटचे कमबॅक! ‘या’ खेळाडूचा पत्ता होणार कट

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी 20 सामना (IND vs AFG) आज खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा प्रयत्न असेल. पहिल्या टी 20 सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) नव्हता. आजच्या सामन्यात मात्र तो खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची (Team India) ताकद वाढली आहे. विराट संघात येणार असल्याने एका खेळाडूचा पत्ता कट होणार आहे. संघ व्यवस्थापन कदाचित तिलक वर्माला संघाबाहेर करू शकते अशी शक्यता आहे. कारण, तिलक वर्माला अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही.

IND vs AFG : IPL मधील वादानंतर कोहली-नवीन पुन्हा येणार आमने-सामने

टी 20 वर्ल्डकप पूर्वी असणारी ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तर या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचं कमबॅक झालं. मात्र या तीन सामन्यांच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळलाच नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे विराट खेळणार नसल्याचं सांगण्यात आले होते.

पहिल्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. अक्षर पटेलने दोन विकेट्स घेत अफगाणिस्तानचे सलामीचे फलंदाज तंबूत परत पाठवले. त्यामुळे अफगाणिस्तानला सुरुवात चांगली करता आली नाही. धाव़गतीही मंदच राहिली. त्यामुळे 20 ओव्हर्समध्ये कशातरी 158 धावा करता आल्या.

Rohit Sharma : शू्न्यावर आऊट झाला तरीही इतिहास रचला; ‘या’ खास रेकॉर्डचा रोहित मानकरी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube