Rohit Sharma : IND vs AFG 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि (IND vs AFG) अखेरचा टी 20 सामना अतिशय थरारक असाच ठरला. भारतासमोर नवख्या असणाऱ्या अफगाणिस्तानने (Afghanistan) जोरदार टक्कर (Rohit Sharma) दिली त्यामुळे 212 टार्गेट देऊनही टीम इंडियाची (Team India) चांगलीच दमछाक झाली. सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरचा खेळ सुरू झाला. यामध्ये पहिली ओव्हर टाय झाली दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र भारताने बाजी मारली आणि शेवटचा सामन खिशात टाकत अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला. मात्र आता या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा दोन वेळा फलंदाजीसाठी उतरला त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण, रोहित शर्माने आधी स्वतःहून मैदान सोडलं होतं.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 212 धावा केल्या होत्या. भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चमकदार फलंदाजी करत शतक ठोकले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्ताननेही चांगली टक्कर दिली. अफगाणिस्तानने 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 212 धावा करत सामना अनिर्णित ठेवला होता. यानंतर सुपर ओव्हरच्या नियमाने खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 16 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले. त्यानंतर वादाला सुरुवात झाली.
‘आधी मॅच टाय, सुपर ओव्हरही टाय नंतर टीम इंडियाच विनर’ भारत-अफगाणिस्तान सामन्यात क्रिकेटचा थरार
या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकेपर्यंत रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल खेळपट्टीवर होते. त्यांनी 15 रनही केले. शेवटच्या एका चेंडूवर दोन धावांची गरज होती. त्यावेळी नॉन स्ट्राईकला रोहित उभा होता. पण त्याने अचानक रिटायर होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिंकू सिंहला मैदानात यावं लागलं. या दोघांनी फक्त एक रन केला यामुळे पहिली सुपर ओव्हर टाय झाली.
त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर टाकली जाणार होती. टीम इंडियाची बॅटिंग होती. यावेळी रोहित शर्मा आणि रिंकू सिंह मैदानात आले. रोहितने जोरदार फटकेबाजी करत 3 चेंडूत 11 धावा चोपल्या. पण पुढील दोन चेंडूंवर दोन विकेट पडल्या. त्यानंतर गोलंदाजीत रवी बिश्नोईने एक रन देत दोन विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाने हा सामना जिंकला. त्यानंतर असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला की रोहितला पुन्हा फलंदाजी कशी करता आली. आधीच्या सुपर ओव्हरमध्ये रिटायर होत त्याने स्वतःहून मैदान सोडले होते.
नियम काय सांगतो ?
क्रिकेटमधील नियमानुसार, एखादा फलंदाज आजारी किंवा दुखापतग्रस्त झाला तर डावाच्या मध्यावर रिटायर होऊ शकतो. त्या फलंदाजाला रिटायर हर्ट समजतात. तो पुन्हा फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. परंतु, एखाद्या फलंदाजाने असे काहीच कारण नसताना जर मैदान सोडले तर त्याला पुन्ही बॅटिंग करण्याची परवानगी दिली जात नाही. असं करायचंच असेल तर आधी प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा त्याला रिटायर आऊट असे समजले जाते.
IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ स्टार खेळाडूंचा पत्ता कट
या सामन्यात रोहित शर्मा रिटायर आऊट होता का याची माहिती अंपायर्सने दिली नाही. मात्र टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित शर्मा रिटायर आऊट होता, तो निवृत्त झाला होता असे म्हटले आहे. आता जर राहुल द्रविडच असे म्हणत असतील तर मग रोहित शर्माची फलंदाजी क्रिकेटच्या नियमाचं उल्लंघन असल्याचे आता सांगितले जात आहे.