India vs Afghanistan T20I Series : दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी दौरा आटोपून टीम इंडिया मायदेशात परतली आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20I Series) यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. टी 20 विश्चषकाआधी (T20 World Cup 2024) ही मालिका भारतात होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने संघाची घोषणा केली आहे. इब्राहिम जादरानकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 11 जानेवारीपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
Team India : कुणी झोपेत चालतं तर, कुणाला वरिष्ठांचा जाच; टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा आज हॅपी बर्थडे
या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात रहमानुल्लाह गुरबाज आणि इकराम अलीखिल यांनाही संघात घेतले आहे. कॅप्टन इब्राहिम जादरान आणि रहमानुल्लाह गुरबाज हे दोघे अफगाणिस्तानचे सलामीवीर असतील. या व्यतिरिक्त फिरकी गोलंदाज आणि फलंदाज राशिद खानही संघात परतला आहे. संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी राशिदकडेच असेल. भारतीय संघाविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
असा आहे अफगाणिस्तानचा संघ
इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इकराम अलीखिल, हजरतुल्लाह जजई, मोहम्मद नबी, करीम जनत, रहमत शाह, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, केस अहमद, गुलबदीन नायब, राशिद खान.