Download App

IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तान विरोधात कोहली विनाच मैदानात उतरणार टीम इंडिया; यामुळे घेतली माघार

IND vs AFG T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 मालिकेसाठी (IND vs AFG T20I Series) दोन्ही संघांकडून जोरदार तयारी सुरू आहे. आज 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. मात्र यामध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोहली नसणार आहे.

Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा 2’ अन् ‘सिंघम 3’मध्ये होणार कांटे की टक्कर

टी ट्वेंटी वर्ल्ड कप पूर्वी असणारी ही शेवटची आंतरराष्ट्रीय सिरीज भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तर या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक झालं. मात्र या तीन सामन्यांच्या सिरीज मधील पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार असल्याचे समोर आलं आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे विराट खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विराट कोहली टीममध्ये नसताना टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कशी असणार पाहुयात…

भाजपने डोळे दाखवताच अजितदादा नरमले; चंद्रकांतदादांनी प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितलं की, या सिरीजच्या पहिल्या सामन्यात कोहली खेळणार नाही. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सहभागी होणार आहे. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजीची संधी देईल. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसंग तर या पहिल्या सामन्यात फलंदाज तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. गोलंदाज म्हणून हर्षदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांचाही विचार केला जाऊ शकतो.

त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आवेश खान, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार ही पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन असू शकते.

follow us

वेब स्टोरीज