Download App

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना संधी

IND vs AUS 2024:  बीसीसीआयने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची (Indian Womens Team) घोषणा केली आहे.

  • Written By: Last Updated:

IND vs AUS 2024:  बीसीसीआयने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची (Indian Womens Team) घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून (BCCI) या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघातून सलामीवीर शफाली वर्माला (Shafali Verma) वगळण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे शफाली वर्माला संघातून बाहेर का करण्यात आले आहे. याबाबत कोणतीही माहिती बीसीसीआयने शेअर केलेली नाही. माहितीनुसार, खराब फॉर्म असल्याने  शफाली वर्माला संघातून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या संघातून युवा ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलला देखील बाहेर करण्यात आले आहे. डी. हेमलथा, उमा छेत्री आणि सायली सतगरे यांना देखील बाहेर करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे  हरलीन देओलची (Harleen Deol) संघात एंट्री झाली आहे. तसेच  युवा यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषला देखील संधी देण्यात आली आहे. तर  लेगस्पिनर आशा शोभना आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर T20 विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरत असल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आलेला नाही.  भारतीय महिला संघ  ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेची सुरुवात 5 डिसेंबरपासून होणार आहे तर या मालिकेचा दुसरा सामना 8 डिसेंबर रोजी आणि या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना 11 डिसेंबर रोजी पर्थमध्ये होणार आहे. त्याच बरोबर पहिला आणि दुसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे.

व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा, बॅलेस्टिक मिसाइल डागले तर होणार अण्वस्त्र हल्ला, जगात खळबळ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, सायमा ठाकोर.

follow us