Download App

Ind vs Aus 2024 : रोहितचा ‘फेअरलेस’ खेळ अन् ‘बापू’चा मॅच फिरवणाऱ्या कॅचने केला ऑस्ट्रेलियाचा गेम

Ind vs Aus 2024 : 'टीम इंडियाच्या चाहत्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे' असं वर्ल्डकप 2023 च्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा  कर्णधार पॅट कमिन्स

  • Written By: Last Updated:

Ind vs Aus 2024 : ‘टीम इंडियाच्या चाहत्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे’ असं वर्ल्डकप 2023 च्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा  कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला होता. त्यानंतर फायनलमध्ये भारताचा पराभव देखील केला होता. भारताचा तो पराभव संपूर्ण देशाच्या जिव्हारी लागला होता. मात्र संपूर्ण देशाला जिव्हारी लागलेल्या या पराभवाचा बदला घेण्यासाठी संधी भारतीय संघाला (Team India) तब्बल सात महिन्यानंतर T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये मिळालीच आणि या संधीचा सोनं करण्यासाठी ‘जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोडेंगे नही’ या बॉलीवूडच्या डायलॉगप्रमाणे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 च्या सामन्यात मैदानात उतरली होती.

मात्र सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का लागला आणि ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांच्या समोर भारताच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. किंग कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला एकही धाव करता आली नाही. जोश हेजलवूडने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मात्र दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एका वेगळ्याच मूडमध्ये फलंदाजी करताना दिसला. विकेटची काळजी न करता त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची तुफान धुलाई केली. रोहितने स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये चार सिक्सर मारून 28 धावा करत ऑस्ट्रेलियन संघाला  आपण आज एक वेगळ्या मूडमध्ये असल्याचे दाखवून दिले. रोहितने अवघ्या 41 चेंडूमध्ये 92 धावांची खेळी केली तर दुसरीकडे सूर्या, शिवम दुबे आणि हार्दिकच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 206 धावांचा लक्ष्य दिले.

206 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला (David Warner) बाद करत पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या ताबडतोड फलंदाजीने ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) भारतीय संघासमोर आव्हान उभे केले. त्याला कर्णधार मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेलने साथ दिली.

ट्रॅव्हिस हेडने आधी कर्णधार मिशेल मार्श सोबत 48 चेंडूमध्ये 81 धावांची तर मॅक्सवेलसोबत 25 चेंडूत 41 धावांची भागीदारी करत सामना आपल्याकडे वळवला होता. मात्र भारताचा फिरकी अष्टपैलू अक्षर पटेलने (Axar Patel) ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शचा अशक्य वाटणारा झेल घेत भारताला या सामन्यात कमबॅक करवला.

कर्णधार मिचेल मार्शनंतर क्रीजवर आलेला ग्लेन मॅक्सवेलने भारतीय संघाची चिंता वाढवली. त्याने कुलदीप, हार्दिक पंड्यासह बुमराहच्या ओव्हरमध्ये शानदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचा स्कोर 10 ओव्हरमध्ये 99 वर पोहोचवला मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या चार ओव्हरमध्ये सामना पूर्णपणे भारताच्या बाजूला झुकला.

कुलदीप यादवने भारतासाठी धोकादायक ठरत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला तर अक्षरने 3 षटकात 21 धावा देत मार्कस स्टॉइनिसची विकेट घेतली. मात्र त्यानंतर देखील तुफान फटकेबाजी करणारा ट्रॅव्हिस हेडचे आव्हान भारतासमोर उभे होते तेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपला ‘हुकूम का एक्का’ जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) गोलंदाजीसाठी आणले. बुमराहने पुन्हा एकदा कर्णधार रोहितला निराश न करता ट्रॅव्हिस हेडचा विकेट घेत आपण जगातील सर्वात बेस्ट गोलंदाज का आहे हे सिद्ध करून दाखवले. त्याने ट्रॅव्हिस हेडला स्लोअर ऑफ कटर टाकले ज्यामुळे चेंडू हवेत उडाला आणि रोहित शर्माने कोणतीही चूक न करता झेल पूर्ण केला.

सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk झाला 12 व्या मुलाचा बाप! सोशल मीडियावर दिली खुशखबर

या सामन्यात भारताकडून अर्शदीप सिंगने 3 कुलदीप यादवने 2 तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने एक एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर रोखले आणि भारताने हा सामना 24 धावांनी जिंकत सेमीफायनल गाठली.

follow us