Download App

“आता बस झालं..” टीम इंडियाच्या पराभवानंतर गंभीर संतापला; खेळाडूंना सुनावले खडेबोल

पराभवावर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले असून त्यांनी ड्रेसिंग रुममध्येच खेळाडूंना चांगलच खडसावल्याची माहिती मिळाली आहे.

Gautam Gambhir Ind vs AUS : मेलबर्न कसोटी सामन्यात जिंकण्याची संधी असताना टीम इंडियाचा (Team India) अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. या पराभवामुळे क्रिकेट चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघात घोर निराशेचं वातावरण (IND vs AUS) आहे. या पराभवावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले (Gautam Gambhir) असून त्यांनी ड्रेसिंग रुममध्येच खेळाडूंना चांगलच खडसावल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर गौतमने संघातील वरिष्ठ खेळाडूंवरही नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता अशीही बातमी समोर येत आहे की सध्या भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगलं नाही.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार ड्रेसिंग रुममध्ये गौतम गंभीरने खेळाडूंच्या कामगिरीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. आपण ज्या प्लॅनिंगवर चर्चा केली होती. ज्या योजना आखल्या होत्या त्यांचे पालन करण्याऐवजी खेळाडू आपल्या मनानुसार वागले. सप्टेंबर महिन्यातील बांग्लादेश विरूद्धच्या मालिकेनंतर फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे गंभीरने सांगितले.

बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, अनोखा कारनामा करणारा ठरला पहिला खेळाडू

रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की मागील काही काळापासून ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगलं नाही. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापासून टीममध्ये काहीसा तणाव जाणवत होता. शंभर कसोटी सामने खेळलेल्या चेतेश्वर पुजाराला संघात घेण्यावर गंभीरने जोर दिला होता. परंतु, निवडकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. भारताने पर्थ टेस्ट जिंकल्यानंतर पुजाराला संघात सहभागी करून घ्यावे यासाठी गंभीर संघ व्यवस्थापनाशी चर्चा करत होता.

मेलबर्न कसोटी सामन्यात 184 धावांनी पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गंभीर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने खेळाडूंना फटकारत आता बस खूप झालं असे गंभीर म्हणाला होता असेही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

follow us