बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, अनोखा कारनामा करणारा ठरला पहिला खेळाडू
Jasprit Bumrah ICC Rankings : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी ( दि. 1) नवीनतम क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धमाका करत इतिहास रचला आहे. बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून, त्याचे रेटिंग गुणही 907 पर्यंत वाढले आहेत. सर्वाधिक रेटिंग गुणांची नोंद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
India star smashes rankings record after Boxing Day Test exploits 💪https://t.co/EzHceJFkxZ
— ICC (@ICC) January 1, 2025
बुमराह ठरला पहिला भारतीय खेळाडू
बुमराहने केलेली कामगिरी हा एक ऐतिहासिक विक्रम असून, इतके रेटिंग गुण मिळवणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा विक्रम मोडीत काढले आहेत. यापूर्वी अश्विनने डिसेंबर 2016 मध्ये सर्वाधिक 904 रेटिंग गुण मिळवले होते. 907 रेटिंग गुणांसह, बुमराह सर्वकालीन यादीत इंग्लंडच्या डेरेक अंडरवुडसह संयुक्त 17 व्या स्थानावर पोहोचला आहे.
बुमराहसाठी संस्मरणीय ठरले गतवर्ष
जसप्रीत बुमराहसाठी 2024 हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. त्याने 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13.76 च्या सरासरीने 86 बळी घेतले. ज्यामध्ये त्याने पाच वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रमही केला. त्याचवेळी त्याने 13 कसोटी सामन्यात 71 विकेट घेतल्या. दुसरीकडे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. असे करणाऱ्या यादीत अन्य कोणताही गोलंदाज बुमराहच्या जवळ नाही.