Download App

IND vs AUS : वर्ल्डकपपूर्वीच जल्लोष ! ऑस्ट्रेलियाला 99 धावांनी धूळ चारत भारताने मालिका जिंकली

  • Written By: Last Updated:

IND vs AUS 2nd ODI : यंदाचा वर्ल्डकप भारतात होत आहे. यापूर्वीच भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाने मोठा धक्का दिला आहे. तीन एकदिवसीय (One Day Series) सामन्याच्या मालिकेत भारताने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकाही जिंकली आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव केला आहे. होळकर स्टेडियमवर भारतीय संघाने सलग सात विजय मिळविला आहे. भारतीय फलंदाजांनी कांगारुंच्या गोलंदाजांची धुलाई करत 399 धावांपर्यंत मजल मारली होती.


IND vs AUS : Video सुर्याने धू धू धुतलं… चार चेंडूत हाणले सलग 4 षटकार

आॅस्ट्रेलियाने नाणेफक जिंकत भारताला फलंदाजीला आमंत्रित केले होते. भारताने 50 षटकांत 5 बाद 399 धावा केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू झाल्यानंतर सामन्यात पावसाना अडथळा आला. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमाचा वापर करून ऑस्ट्रेलियासमोर 33 षटकात 317 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. परंतु ऑस्ट्रेलियाचा सर्वसंघ 217 धावांत गारद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेविड वॉर्नरने चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या कारकीर्दीतील तिसावे अर्धशतक झळकविले. वॉर्नरने 39 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्यात सात चौकार आणि एक षटकार मारला. अबॉटनेही अर्धशतकांची खेळी केली. त्याने 54 धावांची खेळी केली. भारताकडून रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने दोन गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने रचली सर्वोच्च धावसंख्या, गिल-अय्यरची तुफानी खेळी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या रचली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 399 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे आव्हान दिले आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकातच ऋतुराज गायकवाड केवळ आठ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी दिवसभरात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली. ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली.

दुसरीकडे कर्णधार केएल राहुलही मोठे फटके खेळत राहिला. सूर्याने कॅमेरून ग्रीनवर सलग चार षटकार ठोकले. दरम्यान, केएल राहुल 38 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. तर सूर्याने एका बाजूने वेगाने धावा काढल्या. सूर्यकुमार यादवने अवघ्या 37 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. सूर्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 6 षटकार आले. त्याच्यासह रवींद्र जडेजा 9 चेंडूत 13 धावा करून नाबाद राहिला.

Tags

follow us