Video : हवेत झेप घेत विराटचा अप्रतिम झेल, ऑस्ट्रेलियाचा इनफॉर्म बॅटसमन तंबूत

World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा (World Cup 2023) थरारा रंगला आहेत. चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे सलामीवीर मैदानात उतरले होते. पण जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजी […]

Virat Kohli

Virat Kohli

World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा (World Cup 2023) थरारा रंगला आहेत. चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे सलामीवीर मैदानात उतरले होते. पण जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजी पुढे मार्श निभाव लागू शकला नाही.

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मिचेल मार्शला खाते देखील उघडता आले नाही. तो शून्यावर बाद झाला. मार्शला बाद करण्यात विराट कोहलीचा सिंहाचा वाट आहे. त्याने पहिल्या स्लिपमध्ये मार्शचा अप्रतिम झेल घेतला. ऑस्ट्रेलियाला झटका दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मार्शच्या रुपाने बसला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघात ट्रेव्हिड हेड आणि मार्कस स्टॉइनिस नाहीत. दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्यामुळे स्टॉइनिस या सामन्यातून बाहेर आहे. तर ट्रॅव्हिस हेड अद्याप भारतात पोहोचू शकलेले नाहीत. नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला, ‘आम्ही चांगल्या स्थितीत आहेत. या सामन्यांपूर्वी आम्हाला चांगला आराम मिळाला आहे. त्यामुळे आम्ही नव्या दमाने मैदानात उतरत आहोत.

Rohit Pawar : ‘अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण, सावंत’.. रोहित पवार असं का म्हणाले?

भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘येथे गोलंदाजीला चांगली मदत मिळणार आहे. जसजसा सामना पुढे जाईल तसतशी खेळपट्टी चांगली टर्न घेईल. आम्ही पूर्णपणे तयार आहेत. दुर्दैवाने शुभमन दुखापतीतून सावरला नाही. त्याची जागा इशान किशनला संधी दिली आहे.

World Cup 2023 : श्रीलंकेचा पराभव पण, धक्का पाकिस्तानला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर

टीम इंडिया प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग-11 : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.

Exit mobile version