Rohit Pawar : ‘अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण, सावंत’.. रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar : राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूवरून (Nanded Hospital Deaths) राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या मुद्द्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अख्खा महाराष्ट्र्र भिकारी होईल पण, सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. अगदी असंच सध्या सुरू आहे. म्हणून तर ते स्वतःचाच विचार करत आहेत. रुग्ण मृत्यूंबाबत मला काहीच विचारू नका असे ते म्हणत आहेत मग जबाबदारी कुणाची?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
कानाजवळ डीजे वाजवू; शालिनी ठाकरेंच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘दिवस, वेळ ठरवा…’
रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. तसेच त्यांनी छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू झाले. नांदेडमध्ये याची तीव्रता जास्त होती. या प्रकरणात सरकारकडून जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न होत असल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.
यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री करू असंच ते म्हणणार. आत्ताच मुख्यमंत्री करू, आत्ताच न्याय मिळवून देऊ, आत्ताच मृत रुग्णांना मदत करू असं ते म्हणणार नाहीत. नेहमीच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असतं. याआधीही त्यांनी पुन्हा या शब्दावर जोर दिला, असे रोहित पवार म्हणाले.
दुधाची तहान ताकावर! मंत्रिपदाचं नंतर बघू, आता किमान महामंडळ तरी द्या : BJP आमदारांची मागणी