IND vs BAN Asia Cup : आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. रोमहर्षक सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला 259 धावांवर रोखले आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून शुभमन गिलने 121 धावांची खेळी केली. परंतु गिल बाद झाल्यानंतर सामना बांगलादेशच्या बाजूने झुकला. अक्षर पटेल याने फटकेबाजी करून 44 धावा केल्या आहेत. त्याने तीन चौकार आणि षटकार मारले आहेत.
आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात 17 सप्टेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. भारताने यापूर्वीच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. परंतु बांगलादेशविरुद्ध पराभवाचा झटका भारताला बसला आहे. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना झाला आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्यामुळे अवघ्या 60 धावांत बांगलादेशचे चार फलंदाज तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर शाकिब अल हसन आणि तौहिद ह्दोय यांनी शानदार अर्धशतक झळकविले. त्यामुळे बांगलादेशला 265 धावांपर्यंत मजल मारली आहे.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशने 50 षटकांत आठ बाद 265 धावा केल्या आहेत. कर्णधार शाकिब अल हसनने 80 धावांचे योगदान दिले आहेत. तर तौहिद हृदोयने 54 आणि नसूम अहमदने 44 धावांची खेळी केली आहे. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले आहेत. प्रसिध्द कृष्णा, अक्षर आणि जडेजाने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला आहे. तर जडेजाच्या नावावर एक विक्रम नोंदविला आहे. जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे गडी बाद करण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे.
अष्टपैलू जडेजा याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 181 सामन्यांमधील 123 डावांमध्ये 2, 578 धावा केल्या आहेत. कपिल देव यांच्यानंतर जडेजाने भारताकडून दोन विकेट व दोन हजार धावा काढण्याचा विक्रम केला आहे. कपिल देव यांनी एकदिवसीय कारकिर्दीत 221 सामने खेळताना 253 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीत 3783 धावा काढल्या आहेत.