Download App

IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती

Image Credit: letsupp

IND vs ENG 1 Test : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा (IND vs ENG 1 Test) दुसरा दिवसही भारतीय (INDIA)फलंदाजांनी गाजविला. भारतीय फलंदाजीसमोर इंग्लंडच्या (England) गोलंदाजांनी शरणागती पत्करली. दुसऱ्या दिवसअखेर भारताने 175 धावांची मोठी आघाडी घेतलीय. भारताने आतापर्यंत सात बाद 421 धावांपर्यंत मजल मारली आहे


Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अंशतः यश : दहापैकी पाच मागण्या मान्य!

गोलंदाजीत इंग्लंडचे कंबरडे मोडणाऱ्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने फलंदाजीतही जोरदार कामगिरी केलीय. जडेजाने शतकाकडे वाटचाल केली आहे. त्याने 155 चेंडूत 81 धावांची खेळी केली. तर फिरकीपटू अक्षर पटेलही 35 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसरा दिवसही भारताच्या नावावर राहिला आहे.पहिल्या दिवस गाजविणाऱ्या यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजाने जोरदार फलंदाजी करत चारशे धावांची टप्पा ओलांडला.

Vikramaditya Motwane घेऊन येणार जवानांची शौर्यकथा, लवकरच चित्रपटाची घोषणा

भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा 80 धावांवर बाद झाला. शुबमन गिलही 23 धावांवर तंबूत परतला. दोन्ही फलंदाज झेलबाद झाला. त्यानंतर केएल राहुलने 86 धावांची खेळी केली.शतकाकडे वाटचाल करत असताना तोही झेलबाद झाला. मात्र श्रेयस अय्यरला वेगवान गोलंदाज मार्क वूडने जेरीस आणले. वूडच्या अखूड टप्प्याच्या चेंडूवर अय्यर हा अडखळत खेळत होता. तरीही अय्यरने 63 चेंडूत 35 धावांची खेळी केली.


रवींद्र जडेजा व केएस भरतची अर्धशतकीय भागिदारी

केएस भरतने 41 धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि भरतने 68 धावांची भागिदारी केली. परंतु भरत हा धावबाद झाला. तर रवीचंद्रन अश्विनही लगेच तंबूत परतला. तो एका धावेवर बाद झाला. पण नवव्या क्रमांकाला फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलनेही जडेजाला साथ दिली. या जोडीने 63 धावांची भागिदारी केली आहे.

इंग्लंडकडून टॉम हार्टली आणि जो रुटने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर जॅक लीट आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

follow us

वेब स्टोरीज