Download App

भारताच्या अडचणी वाढणार, चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूला संधी

  • Written By: Last Updated:

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson-Tendulkar Trophy) चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाच कसोटी मालिकेतील (IND vs ENG) चौथा सामना मँचेस्टरमधील (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर 23 जलै ते 27 जुलैदरम्यान होणार आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना इंग्लंडचा गोलंदाज शोएब बशीरला (Shoaib Bashir) बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.

इंग्लंडने संघाने त्याच्या जागी चौथ्या सामन्यासाठी लियाम डॉसनचा (Liam Dawson) संघात समावेश केला आहे. 25 वर्षीय अष्टपैलू लियाम डॉसनने आतापर्यंत 3 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने चेन्नईमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्या सामन्यात करुण नायरने त्रिशतक केले. त्याने सप्टेंबर 2016 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

तर दुसरीकडे इंग्लंडने लॉर्ड्स मैदानात झालेल्या रोमांचक सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव करत या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. जर मँचेस्टर कसोटी सामना इंग्लंडने जिंकला तर इंग्लंड मालिका आपल्या नावावर करेल. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.

‘सैयारा’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धमाका!

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

follow us