‘सैयारा’च्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धमाका!

Saiyara Advance Bookings : यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांचा बहुचर्चित प्रेमकथानक चित्रपट ‘सैयारा’ (Saiyara) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आजपासून ‘सैयारा’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल्ल च्या जवळपास पोहचले आहे.
ट्रेड विश्लेषकांच्या मते, ‘सैयारा‘ ही नवोदित कलाकारांची फार थोडी यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरू शकते. केवळ कथा आणि अभिनयच नव्हे, तर संगीत क्षेत्रातही ‘सैयारा’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गाण्यांचा हा अल्बम समजला जात आहे.
या अल्बममधील गाणी: फहीम-अरसलान यांचे ‘सैयारा टायटल ट्रॅक’ जो आधीच ब्लॉकबस्टर ठरला आहे,जुबिन नौटियाल यांचे ‘बर्बाद’, विशाल मिश्रा यांचे ‘तुम हो तो’, सचेत-परंपरा यांचे ‘हमसफर’,अरिजीत सिंग आणि मिथुन यांचे ‘धुन’, श्रेया घोषाल यांचे ‘सैयारा रिप्राइज’,व शिल्पा राव यांचे ‘बर्बाद रिप्राइझ’ ही सर्व गाणी सध्या संगीत चार्टवर गाजत आहेत.
Video : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले
‘सैयारा’ 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामार्फत वायआरएफने आपल्या पुढील पिढीतील कलाकारांना आहान पांडे आणि अनीत पड्डा प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे.