Video : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले

Shubhanshu Shukla : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला त्यांचे मिशन पूर्ण करून 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहे. शुभांशू शुल्का (Shubhanshu Shukla) यांचे ड्रॅगन मंगळवारी दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो (San Diego) येथे उतरले आहे. अॅक्सिओम-4 (Axiom-4) मोहिमेत सहभागी असलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन जण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) 18 दिवस राहून आणि 22.5 तास प्रवास केला आहे. शुभांशूचे हे अभियान 2027 मध्ये मानवी अंतराळयान प्रक्षेपित करण्यास मदत करेल.
18 दिवसांनंतर परतले
शुभांशू शुल्का यांनी या मोहिमेदरम्यान 18 दिवस अंतराळात घालवले आहेत. भारतीय हवाई दलाचे कॅप्टन शुभांशू शुक्ला, कमांडर पेगी व्हिटसन, मिशन तज्ञ स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांना घेऊन जाणारे ड्रॅगन ‘ग्रेस’ अंतराळयान सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:45 वाजता अंतराळ स्थानकापासून वेगळे झाले होते. 1984 नंतर अंतराळात जाणारे शुभांशू हे भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत. 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.
#WATCH | In a historic moment, Group Captain Shubhanshu Shukla and the Axiom-4 crew aboard Dragon spacecraft splashes down in the Pacific Ocean after an 18-day stay aboard the International Space Station (ISS)
(Video Source: Axiom Space/YouTube) pic.twitter.com/qLAq2tyW5S
— ANI (@ANI) July 15, 2025
10 दिवस देखरेखीखाली राहणार
शुंभाशू शुल्का पृथ्वीवर परतले असून आता त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोग्य तपासणीसाठी आणि अंतराळातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांतून बरे होण्यासाठी त्यांना 10 दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. यानंतर ते भारतात परतणार आहे.
अॅक्सिओम-4 मोहीम खास का होती?
1984 मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत.
या मोहिमेने भारताला आंतरराष्ट्रीय अंतराळ समुदायात एक मजबूत खेळाडू म्हणून दाखवून दिले आहे.
… तर जरांगे अन् एकनाथ शिंदेंना जागा दाखवणार; ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा इशारा
शुभांशू शुक्ला आणि त्यांचे सहकारी मिशन कमांडर पेगी व्हिट्सन, मिशन तज्ज्ञ सुवे उझनान्स्की-विस्निव्स्की आणि टिबोर कापू यांनी 25 जून रोजी फ्लोरिडा येथून त्यांचा अंतराळ प्रवास सुरू केला.