‘सैयारा’ स्टार अनीत पड्डाचा वाचवलेल्या भटक्या प्राण्यांसोबत एक दिवस

Aneet Padda: अनीतने संपूर्ण दिवस भटक्या आणि वाचवलेल्या प्राण्यांसोबत वेळ घालवला. प्राण्यांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केल.

  • Written By: Published:
Aneet Padda Visit Kanchan Global Foundation

Aneet Padda Visit kanchan Global Foundation: सैयारा या चित्रपटाच्या ऐतिहासिक यशानंतर अनीत पड्डा (Aneet Padda) 2025मधील सर्वात मोठ्या ब्रेकथ्रू स्टार्सपैकी एक ठरली आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा प्रेमकथा चित्रपट ठरलाय.

सोशल मीडियावर स्वतःशी प्रामाणिक राहिल्यामुळे अनीतला इंटरनेटवरील सर्वात “रिलेटेबल गर्ल” म्हणून ओळखले जाते. तिने मुंबईच्या उपनगरातील एका प्राणी आश्रयस्थानाला भेट दिल्याचा अत्यंत सुंदर आणि मनाला भिडणारा पोस्ट शेअर करून पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चा निर्माण केली. अनीतने संपूर्ण दिवस भटक्या आणि वाचवलेल्या प्राण्यांसोबत वेळ घालवला आणि सर्वांना त्यांच्या पद्धतीने या प्राण्यांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केल. (
Aneet Padda Visit kanchan Global Foundation)


Rohit Arya : पवईतील RA स्टुडिओची स्क्रिप्ट रोहितने 4 ऑक्टोबरलाच अभिनेत्रीला फोनवर सांगितलेली

अनीतने कंचन ग्लोबल फाउंडेशनला (kanchan Global Foundation) भेट दिली. जी मुंबईतील गरजू प्राण्यांना वाचवणे, त्यांचा पुनर्वसन करणे आणि त्यांची काळजी घेणे या उद्देशाने कार्यरत असलेली एक सामाजिक संस्था आहे. आश्रयस्थानात ती प्राण्यांसोबत खेळताना आणि त्यांना अन्न खाऊ घालताना दिसली. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, या आत्म्यांसोबत काही वेळ घालवला जे भाषेविना प्रेम करतात. माझ्या कपड्यांवर फर लागलं आणि मनात शांतता भरली. धन्यवाद कंचन ग्लोबल फाउंडेशन , खरंच महत्त्वाचं आहे याची आठवण करून दिल्याबद्दल.


‘नतमस्तक’ या मराठी चित्रपटाची पोस्टर लाँचद्वारे घोषणा

कंचन ग्लोबल फाउंडेशन ही गरजू प्राण्यांना वाचवणे, पुनर्वसन करणे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी समर्पित सामाजिक संस्था आहे. त्यांचं अप्रतिम काम पाहून प्रेरणा मिळाली. कृपया कंचन ग्लोबल फाउंडेशनला भेट द्या, त्यांच्या ध्येयाबद्दल जाणून घ्या आणि आपण कशी मदत करू शकता ते बघा… जर तुम्हाला इच्छा असेल तर असे ती लिहिते. या गोंडस जीवांसोबत वेळ घालवण्याची संधी दिल्याबद्दल आणि एवढं प्रेम परत मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार…

follow us