IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson – Tendulkar Trophy) चौथ्या कसोटी सामना मँचेस्टरमध्ये (Manchester) आजपासून सुरु झाला असून या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहे. भारताने या सामन्यासाठी करुण नायरच्या (Karun Nair) जागी साई सुदर्शनला संधी दिली आहे. तर अंशुल कंबोजने पदार्पण केले आहे. नितीश रेड्डीऐवजी शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे.
4th TEST..India XI : Y.Jaiswal, KL.Rahul, S.Sudharsan, S.Gill (c), R.Pant (wk), R.Jadeja, W.Sundar, S.Thakur, A.Kamboj, J.Bumrah, M.Siraj. https://t.co/L1EVgGu4SI #ENGvIND #4thTest
— BCCI (@BCCI) July 23, 2025
मँचेस्टर कसोटीत वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज पदार्पण केले आहे. भारताकडून कसोटी पदार्पण करणारा तो 318 वा खेळाडू आहे. कंबोजची पदार्पण कॅप दीप दासगुप्ताने दिली.
भारत प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अंशुल कंबोज.
सर्वात मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरवर संसदेत 29 जुलैपासून चर्चा
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर