IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्या साऊथहॅम्प्टन झालेल्या पाचव्या आणि मालिकेतील शेवटच्या सामन्यात देखील भारताचा पराभव झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 56 धावांनी बाजी मारली आहे. इंग्लंडने ही मालिका 4-0 जिंकली असून या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसरीकडे तीनपेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत भारताला एकही सामना जिंकता न येण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
साऊथहॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी20 सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 257 धावा केल्या आणि भारतासमोर 258 धावांचे आव्हान ठेवले. जोस बटलरने 64 चेंडूंत 131 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये 12 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. कर्णधार हॅरी ब्रुक 45 चेंडूंत 95 धावांवर नाबाद राहिला त्याने 4 चौकार आणि 8 षटकार मारले. फिल सॉल्ट 9 चेंडूंत 6 धावा करून बाद झाला, तर जेकब बेथेलला त्याने सामना केलेल्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद व्हावे लागले. विल जॅक्सने 2 चेंडूंत 7 धावा केल्या.
258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. 21 धावसंख्येवर भारताने पहिली विकेट गमावली. अभिषेक शर्माने केवळ तीन धावा केल्या . त्यानंतर, संघाची धावसंख्या 55 असताना संजू सॅमसन 14 चेंडूंत 27 धावा करून बाद झाला. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या विकेटसाठी 30 चेंडूंत 55 धावांची भागीदारी केली, परंतु त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर 16 चेंडूंत 28 धावा करून बाद झाला. यानंतर भारताने एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या.
England win the fifth and final T20I by 56 runs to take the series 4-0.
Scorecard ▶️ https://t.co/7mo5osv0MW#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/iy1b88cP4V
— BCCI (@BCCI) July 11, 2026
कर्क राशीसह पाच राशींना आज होणार मोठा फायदा, मिळणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्वकाही –
जरी इशान किशन (35 चेंडूंत 56 धावा) आणि तिलक वर्मा (25 चेंडूंत 53 धावा) यांनी प्रभावी अर्धशतकी खेळी केल्या, तरीही ते भारताला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. शिवम दुबेने 14, शेडगेने 7, अक्षर पटेलने 3, अर्शदीप सिंगने 4 आणि प्रसिद्ध कृष्णाने 1 धाव केली. भारताला निर्धारित 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ201 धावा करता आल्या आणि त्यांना 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
