IND vs ENG : भारतीय संघात होणार पाचव्या टी 20 साठी 3 मोठे बदल; तिलक वर्मासह 2 स्टार खेळाडू बाहेर?

IND vs ENG :  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील आज पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

IND Vs ENG

IND vs ENG :  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील आज पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 3-0 अशी अघाडी घेतली आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. भारतीय संघासाठी आज होणारा शेवटचा टी 20 सामना महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संघ या मालिकेत क्लीन स्वीप टाळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आज भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात.

तिलक वर्मा

भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा गेल्या काही दिवसांपाासून खराब कामगिरी करताना दिसत आहे. त्याला धावा करण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यामुळे तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावा लागू शकतो तर त्याच्या जागी पुन्हा एकदा संघात संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

अक्षर पटेल

स्पिन अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचे संघातील स्थानही धोक्यात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर तो बराच काळ संघर्ष करत आहे, त्यामुळे त्याला ‘प्लेइंग इलेव्हन’मधून वगळण्याची मागणी होत आहे. त्याच्या सततच्या खराब फॉर्ममुळे, संघ व्यवस्थापन त्याच्या जागी सूर्यांश शेडगेला संधी देऊ शकते, ज्याने इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत अद्याप एकही सामना खेळलेला नाही.

Horoscope July 11 :  मेष, वृषभसह ‘या’ आज या राशींना होणार फायदा, मिळणार आर्थिक लाभ

वॉशिंग्टन सुंदर

स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजी अत्यंत खराब झाली आहे आणि त्यालाही संघाबाहेर केले जाऊ शकते. दरम्यान, मालिका संपण्यापूर्वी रवी बिश्नोईला आणखी एक संधी दिली जाऊ शकते.  या दौऱ्यात दोन्ही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक असली, तरी वरुण चक्रवर्तीच्या दुखापतीचा फायदा बिश्नोईला मिळू शकतो.

follow us