नवीन कर्णधाराची घोषणा, BCCI ने बॅन केल्यानंतर हॅरी ब्रूककडे मोठी जबाबदारी

Harry Brook : इंडियन प्रीमियर लीगमधून हॅरी ब्रूक (Harry Brook) याला दोन वर्षांसाठी बीसीसीआयने बॅन केल्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड ईसीबीने (ECB) त्याच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. आज इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. जोस बटलरने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत इंग्लंडच्या व्हाईट बॉल संघाचा कर्णधार होता मात्र त्याने कर्णधारपद सोडल्याने आता ईसीबीने हॅरी ब्रूकला मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अधिकृत मीडिया रिलीज जारी करून म्हटले आहे की हॅरी ब्रूकची इंग्लंड पुरुष व्हाईट बॉल संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून इंग्लंडच्या लवकर बाहेर पडल्यानंतर जोस बटलरने राजीनामा दिला होता, त्याऐवजी ब्रूकची नियुक्ती करण्यात आली आहे.
जानेवारी 2022 मध्ये पदार्पण केल्यापासून 26 वर्षीय ब्रूक इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघात एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याला सर्व फॉरमॅटमध्ये देशातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक मानले जाते. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हॅरी ब्रूकने गेल्या वर्षी एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही स्वरूपात उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, एकाच दिवसात 13.4 लाख कोटी बुडाले, चक्क 543 शेअर्सना लोअर सर्किट
तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बटलरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही त्याने संघाचे नेतृत्व केले होते. 2018 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयसीसी अंडर-19 विश्वचषकात इंग्लंडचे नेतृत्वही ब्रूकने केले आहे. ब्रूकने आतापर्यंत इंग्लंडसाठी 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, हॅरी ब्रुकने 34 च्या सरासरीने 816 धावा केल्या आहेत.