IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्या सुरु असणाऱ्या पाच टी20 मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने 4 विकेटने जिंकला आहे. मँचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच, वैभव सूर्यवंशी हा भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. या सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही मात्र अभिषेक शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इंग्लंडकडून सॅम करनने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 विकेट घेतले. तर जेकब बेथेलने स्फोटक अर्धशतक ठोकून सामन्याचे चित्रच पालटून टाकले.
भारतासाठी सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 24 चेंडूत 43 धावांची चांगली खेळी केली. वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, इशान किशनने 40 चेंडूत 49 धावा केल्या आणि त्यानंतर तो सॅम करनचा विकेट ठरला.
कर्णधार श्रेयस अय्यरनेही शानदार खेळी करत 22 चेंडूत 37 धावा केल्या, ज्यामध्ये 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तिलक वर्माने 11 चेंडूत 24 धावांची जलद खेळी केली. भारताने 20 षटकांत 7 बाद 190 धावांची मजल मारली. इंग्लंडसाठी सॅम करनने 3 विकेट घेतले, तर जोफ्रा आर्चर आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
अग्रवाल कुटुंबावर दु: खाचा डोंगर; उपचारादरम्यान केतनच्या आजोबांचेही निधन
191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिल सॉल्ट खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आणि जोस बटलरही शून्य धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीरांना धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रुकने डावाची धुरा सांभाळली. त्याने 15 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर टॉम बँटनने 32 चेंडूत 39 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जेकब बेथेलने 46 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली. त्याने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. इंग्लंडने अवघ्या 19 षटकांत 6 बाद 191 धावा करत सामना जिंकला.
