IND vs ENG : अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीचा (Anderson -Tendulkar Trophy) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना उद्यापासून (31 जुलै) ओव्हल (Oval Test) येथे खेळवला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटीत ऑली पोप (Ollie Pope) संघाचा नेतृत्व करणार आहे.
पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग 11 मध्ये तीन मोठे बदल केले आहे. बेन स्टोक्ससह वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, अष्टपैलू लियाम डॉसन आणि बायडेन कार्स यांना प्लेइंग 11 मधून वळगण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन आणि जोश टोंग यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी दुखापतीमुळे बेन स्टोक्स उपलब्ध नसणार आहे. उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने स्टोक्स हा सामना खेळणार नाही. स्टोक्सला लॉर्ड्स आणि मँचेस्टर कसोटी दोन्हीमध्ये सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यामुळे त्याची अनुपस्थिती यजमान संघासाठी मोठा धक्का आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने संघात चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टोंग हे क्रिस वोक्सला साथ देतील.
Ben Stokes will miss out on the final Test of the series with a right shoulder injury ❌
And we’ve made four changes to our side 👇
— England Cricket (@englandcricket) July 30, 2025
मँचेस्टर कसोटी ड्रॉ
पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. ओव्हलवर मालिका बरोबरीत आणण्याची भारतीय संघाकडे उत्तम संधी आहे. मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांविरुद्ध खूप प्रयत्न करावे लागले. शेवटी इंग्लंडला सामना अनिर्णित करावा लागला. स्टोक्सने म्हटले होते की तो त्याच्या गोलंदाजांना दुखापतीपासून वाचवू इच्छित होता परंतु त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि निर्णायक कसोटीपूर्वी संघात मोठे बदल करावे लागले.
जर मोदींनी नाव घेतले तर ट्रम्प सत्य सांगणार; राहुल गाधींचा PM मोदींवर हल्लाबोल
ओव्हल कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग-11
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.