Download App

IND vs ENG : धरमशाला कसोटीत पावसाचा व्यत्यय? हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये (India vs England) एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. आज थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे. परंतु, हा सामना संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा सामना धरमशाला येथे होत आहे. धरमशालात तापमान खूप कमी आहे. काही दिवसांपूर्वी येथे बर्फवृष्टीही झाली होती. त्यामुळे येथे पुन्हा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचीही शक्यता आहे. असे जर झाले तर सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.

AccuWeather च्या अंदाजानुसार पहिल्याच दिवशी पावसाचा अंदाज आहे. सुरुवातीलाच ढगाळ हवामान राहिल. सामना सुरू झाल्यानंतर पाऊस होण्याची शक्यता आहे. सामना वेळेवर सुरू झाला तरी नंतर मात्र पाऊस होऊ शकतो. पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. पाऊस जर झाला तर सामना थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

IND vs ENG : इंग्लंडला नमवलं! गिल-जुरेलच्या खेळीने टीम इंडियाने 17 वी मालिका जिंकली

टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखालील इंग्लंडने या सामन्यापूर्वी मेहनत घेतली आहे. इंग्लंडने काल प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. इंग्लंडने ओली रॉबिन्सनला ब्रेक दिला आहे. त्याच्या जागी मार्क वुड प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. या मालिकेत वुडला आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळता आले आहेत. तो रांची कसोटीचा भाग नव्हता. वुडने भारताविरुद्ध हैदराबाद आणि राजकोटमध्ये सामने खेळले आहेत. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने 4 विकेट घेतले होते. मात्र, याशिवाय त्याला विकेट घेता आली नाही.

रॉबिन्सनला या मालिकेत आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. रॉबिन्सन रांची कसोटीत खेळला होता. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. पण एकही विकेट घेऊ शकला नाही. आता इंग्लंडची धर्मशालात या बदलांसह मैदानात उतरणार आहे. इंग्लंडच्या संघात झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन या खेळाडूंचा समावेश आहे.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल, दोन खेळाडू बाहेर

follow us

वेब स्टोरीज