IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल, दोन खेळाडू बाहेर

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल, दोन खेळाडू बाहेर

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG) अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी तगडी आघाडी घेतली आहे. आता अंतिम सामना 7 मार्चपासून धर्मशाला (Dharamshala)येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी गुरुवारी बीसीसीआयने (BCCI)पाचव्या कसोटीच्या संघामध्ये काही बदल केले आहेत.

योगेश सावंतवरून सभागृहात आरोप-प्रत्यारोप; रोहित पवार म्हणाले, ‘होय, योगेश आमचा कार्यकर्ता…’

अंतिम सामन्यातून क्रिकेटपटू केएल राहुललाही (KL Rahul)पाचव्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. तर वॉशिंग्टन सुंदरला (Washington sundar)संघातून मुक्त करण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. त्याचवेळी रांची कसोटीत विश्रांती दिलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं पुनरागमन झालं आहे.

केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भाग घेतला होता. त्या सामन्यात त्याच्या बॅटने पहिल्या डावात 86 आणि दुसऱ्या डावात 22 धावा केल्या होत्या. मात्र, यानंतर त्याला स्नायूंचा ताण आला आणि पुढील तीन सामन्यांत तो खेळू शकला नाही.

योगेश सावंतवरून सभागृहात आरोप-प्रत्यारोप; रोहित पवार म्हणाले, ‘होय, योगेश आमचा कार्यकर्ता…’

धर्मशाला कसोटीसाठी त्याची निवडही त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होती पण आता त्याला त्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी लंडनला जावे लागणार आहे. या कारणास्तव तो पाचव्या कसोटीचा भाग असणार नाही.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताचा नवीन संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube