Download App

IND vs ENG कसोटी मालिका कधी आणि कुठे पाहता येणार? एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही

IND vs ENG Live Streaming: भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार असून या दौऱ्यावर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका

IND vs ENG Live Streaming: भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार असून या दौऱ्यावर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका (IND vs ENG Test 2025) खेळणार. या मालिकेची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. नुकतंच या दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा देखील करण्यात आली आहे. भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा नेतृत्व करणार आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या निवृत्तीनंतर होणारी पहिली कसोटी मालिका भारतीय संघासाठी खूप महत्वाची असणार आहे कारण या मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन चक्राची सुरुवात होणार आहे. तर चाहत्यांना ही मालिका कुठे आणि कधी पाहता येणार आहे याबाबत जाणून घ्या.

मालिका कधी सुरू होईल?

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे मात्र त्याआधी भारतीय संघ इंडिया ए विरुद्ध 13 जून रोजी सराव सामना खेळणार आहे. तर या दौऱ्यावर भारतीय संघ शेवटचा सामना 31 जुलै रोजी खेळणार आहे.

कुठे पाहता येणार मालिका?

क्रिकेट चाहत्यांना ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर JioHotstar द्वारे लाईव्ह स्ट्रीम पाहता येणार आहे.

मालिकेचे वेळापत्रक

या दौऱ्यात भारतीय संघ पहिला कसोटी सामना 20 जून रोजी हेडिंग्ली येथे, दुसरा सामना 2 जुलै रोजी एजबॅस्टन येथे, तिसरा सामना 10 जुलै रोजी लॉर्ड्स येथे, चौथा सामना 23 जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे आणि पाचवा सामना 31 जुलै रोजी द ओव्हल येथे खेळणार आहे.

नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, मुसळधार पावसानंतर मंत्री विखे ॲक्शन मोडमध्ये

मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

follow us